पंतप्रधान आज ”परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमातून साधणार विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद

0
43

Aapli Maay Marathi News Network : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ७ वाजता ”परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर यंदा हा कार्यक्रम दूरदृष्य प्रणालीद्वारे होणार आहे. कोणताही ताण न घेता विद्यार्थ्यांनी परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमानिमित्त एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं;

यातील विजेत्यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे. या कार्यक्रमाचं प्रसारण आकाशवाणीवरून केलं जाणार आहे; त्यामुळे आज संध्याकाळी सात वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि कोरोना वृत्त विशेष हे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या रात्री सव्वा नऊच्या राष्ट्रीय मराठी बातमीपत्राच्या वेळेतही बदल होण्याची शक्यता आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here