…म्हणून इलेक्ट्रीक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार- अजित पवार

0
27

पुणे : राज्यातील वाढते प्रदूषण, वाहतुकीची कोंडी कमी आणि त्यापासून उद्भवणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रीक‍ गाडयांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तसेच जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड येथे फिटवेल मोबिलीटी प्रायव्हेट लिमिटेडच्या महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांसाठीच्या इलेक्ट्रीक थ्री-व्हिलर गाडयांच्या वितरण सेवेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनाच्या मर्यादा लक्षात घेतल्या तर इलेक्ट्रीक मोटारी प्रवासी व मालवाहतूकीसाठी एक चांगला, माफक, स्वच्छ व प्रदुषणमुक्त, फायद्याचा पर्याय आहे, असंही यावेळी अजितदादांनी म्हटलंय.

आता इलेक्ट्रीक वाहनांचे विक्री हब म्हणून नवीन ओळख पिंपरी-चिंचवड शहराला मिळेल. फिटवेल मोबिलीटीच्या माध्यमातून विक्री होणा-या इलेक्ट्रीक थ्री-व्हिलर गाडया या सर्व प्रकारच्या प्रदुषणापासून मुक्त असतील. राज्यातलं वाढतं प्रदुषण आणि त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके लक्षात घेता सरकारनं नवीन इलेक्ट्रीक वाहन धोरण जाहीर केलं आहे. या धोरणानुसार राज्यात इलेक्ट्रीक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं.

दरम्यान, पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त राजेश पाटील, फिटवेल मोबिलिटी प्रा. लि.चे रवींद्र कंग्राळकर, चैतन्य शिरोळे, ए. शशांक, श्री. केदार, जगदीश कदम व कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here