…त्यामुळे ‘ही’ साहेबांच्या विचारांची राष्ट्रवादी नाही : चित्रा वाघ

0
86

अकलूज : अकलूजमध्ये अकलूज नगर परिषद आणि नातेपुते नगर पंचायतसाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी चित्र वाघ आल्या होत्या. जनतेच्या प्रश्नापासून पळ काढण्यासाठी सरकार दोन दिवसांचे अधिवेशन घेत आहे. जर पूर्ण वेळ अधिवेशन घेतले तर भाजप यांना फाडून खाईल याची भीती वाटत आहे, असा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर देखील तोफ डागली.

आताची राष्ट्रवादी शरद पवारांच्या विचारांची राहिली नाही. आपणही 20 वर्षे राष्ट्रवादीत काम केलं आहे. साहेबांच्या राष्ट्रवादीत काम केलं आहे. त्यामुळे ही साहेबांच्या विचारांची राष्ट्रवादी नाही हा माझा विश्वास आहे, असं भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. त्यांनी या वक्तव्यानं राष्ट्रवादीच्या आगामी फळीतील नेत्यांना टार्गेट केलं आहे.

साहेबांच्या राष्ट्रवादीत राजकीय अभिनिवेश बाजूला ठेऊन लोकांच्या प्रश्नाला न्याय मिळाला असता. आज शेकडो भगिनी कोरोनाच्या संकट काळातही आपल्या प्रश्नासाठी घरदार सोडून रस्त्यावर बसल्यात हे साहेबांनी होऊ दिलं नसतं. मात्र आज जे चाललं आहे ते साहेबांच्या विचारांची राष्ट्रवादी असती तर झालं नसतं, असा रोषही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, मी शरद पवार यांच्या तालमीत तयार झाले आहे, हे सांगायला मला जराही संकोच वाटत नाही. पवार हे माझ्या वडिलांसारखे आहेत. मी राजकारणात शरद पवारांकडून खूप काही शिकले आहे, असं त्यांनी या आधीही म्हटलं होतं. अकलूजमध्ये आंदोलन सुरू असताना शरद पवार जवळच्या परिसरात असताना देखील त्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली नाही, त्यामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here