‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’; चित्रा वाघ

0
121

मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली होती. देशमुखांनी तर राजीनामा दिला आता प्रश्न आहे की नवा वसूली मंत्री कोण?, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. याला चाकणकरांनी प्रत्युत्तर देत चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केली आहे.

ताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण?? अहो ताई भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत’ हे म्हणायची वेळ येईल. थोडा धीरज रखो, सब सच सामने आयेगा.!!, अशी टीका चाकणकरांनी केली होती. याला चित्रा वाघ यांनी ट्विट करत चाकणकरांना चांगलेच खडेबोलत सुनावले आहेत.

अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी जर स्त्री असेल तर व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी ‘ही’ मंडळी भ्याडच म्हणावी लागतील, अशी बोचरी टीका चित्रा वाघ यांनी अप्रत्यक्षपणे रूपाली चाकणकरांवर केली आहे. सूडाच्या भावनेतून होणारं राजकारण फार काळ टिकणारं नाही हे लक्षात ठेवा, असा इशारा चित्रा वाघ यांनी रूपाली चाकणकरांना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here