दिवाळीनंतर शाळा, कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा विचार- वर्षा गायकवाड

0
110

मुंबई :  राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा त्याचप्रमाणे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार, असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, “पहिल्यांदा नववी ते बारावी या इयत्तांचे वर्ग सुरु केले जातील. त्यानंतर बाकी परिस्थिती पाहता उर्वरित वर्ग टप्प्याटप्याने सुरु केले जाऊ शकतात.” नववी आणि बारावी या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष महत्त्वाचं असल्याने त्याचे वर्ग सुरु करण्याचा प्रामुख्याने विचार केला जाईल. सरसकट शाळा सुरू करून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याशी सरकार खेळणार नाही, असंही गायकवाड यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here