हाही काळ निघून जाईल, पुढे सोन्याची झळाळी निश्चित येईल – उद्धव ठाकरे

0
30

मुंबई : महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कामगार आणि शेतकरी दोन्ही उतरले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सर्व हुतात्म्यांना मानाचा मुजरा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आजच आपण ज्या पद्धतीने संयम दाखवत आहोत, तो जर दाखवला असता तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं. अजूनही आपल्याला बंधनं पाळणं गरजेचं आहे. मगील वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला. त्यावेळी आपल्या महाराष्ट्रात फक्त दोन लॅब होत्या. आज 29 एप्रिल 2021 ला सध्या राज्याता 609 प्रयोगशाळा सुरु झाल्या आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

तिसरी लाट येणार असं तज्ञ सांगत आहेत. तिसऱ्या लाटेचे घातक परिणाम महाराष्ट्रावर होऊ देणार नाही. त्यासाठी सरकारनं कंबर कसली आहे. उद्योजकांना तिसऱ्या लाटेची तयारी करायला सांगितली आहे. काही जण लॉकडाऊनला विरोध करत होते, मात्र लॉकडाऊन लावलं नसतं तर काय परिस्थिती झाली असती?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here