पुलवामा प्रकरणी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांची काँग्रेसवर टीका

0
87

Aapli Maay Marathi News Network : पुलवामात झालेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानचेचं कारस्थान असल्याचं पाकिस्तानच्या मंत्र्याने सांगितलं. यावरून भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर टीका केलीये. काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे अशा आशयाचं ट्विट केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.

प्रकाश जावडेकर त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “पुलवामा येथे हल्ला केल्याचं पाकिस्तानने कबूल केलंय. आता काँग्रेस आणि बाकी लोकं जे म्हणत होते की हा कट आहे त्यांनी माफी मागितली पाहिजे.” 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावर पुलवामामध्ये सुरक्षा दलांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आलं होतं. त्यावेळी काँग्रेस व इतर पक्षांनी हा हल्ला म्हणजे ‘राजकीय कट-कारस्थान’ असल्याचं म्हटलं होतं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here