विराटला सामन्यादरम्यान ‘स्लो ओवर रेट’साठी लाखो रुपयांचा दंड

0
193

Aapli Maay Marathi News Network :
यंदाच्या वर्षी आयपीएलचे सामने भारतात होत नसले, तरीही या सामन्यांना मिळणारी क्रीडा रसिकांची लोकप्रियता मात्र तसूभरही कमी झालेली नाही. अशाच उत्साही वातावरणात दररोज आयपीएलचे सामने पार पडत आहेत. सोशल मीडियावरही याचे पडसाद पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गुरुवारी पार पडलेल्या पंजाब विरुद्ध बंगळुरूच्या सामन्यात विराट कोहलीला अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

इतकंच नव्हे, तर त्याला याचा फटका आर्थिक स्वरुपातही बसला. सामन्या दरम्यान ‘स्लो ओवर रेट’साठी त्याला तब्बल १२ लाख रुपयांचा दंड लावण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं. ‘बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याला IPL 2020 मधील पंजाबविरोधातील सामन्यात त्याच्या संघाच्या स्लो ओवर रेटसाठी दंड लावण्यात येत आहे’, अशी माहिती लीगकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here