पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ ही चार राज्यं तसंच पुदुच्चेरीत विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी

0
26

Aapli Maay Marathi News Network : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि  केरळ ही चार राज्यं तसंच पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा  निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. या पाच राज्यात टपाल मतपत्रिकेद्वारे जवळपास १३,१६,००० मतदान झालं असून मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात असून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

या पाच राज्यांबरोबरच देशभरातल्या लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतल्या विधानसभेच्या बारा मतदारसंघातल्या पोटनिवडणूकींची मतमोजणीही आज होणार आहे. यात बेळगाव लोकसभा आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचाही समावेश आहे.

मतमोजणीचे कल आणि निकाल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहेत. व्होटर हेल्पलाईन या मोबाईला अॅपवरही आपल्याला मतमोजणीचे काल आणि निकाल कळू शकतील.

मतमोजणी केंद्रांवर कोविड निर्बंधांच काटेकोर पालन होतं की नाही याकडे जातीनं लक्ष देण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीनं आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवाल सादर केला नाही तर त्यांना मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार नाही.

निवडणूक निकालाची सगळ्यांनाच उत्सुकता असली तरी यावेळी कोरोना निर्बंधांमुळे कुठेही विजय मिरवणुका काढता येणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here