क्रिकेट का खुलासा: हरभजनच्या ट्विटने क्रिकेट जगतात खळबळ

0
169

Aapli Maay Marathi News Network :
भारतीय स्पिनर हरभजन सिंगने शनिवारी एक ट्विट केलं. ज्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. हरभजनने क्रिकेट जगताशी संबंधित काही गुपीत त्याला कळाल्याचं म्हटलं आहे. यामुळे क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून जाईल असं देखील त्याने म्हटलं आहे. टर्बनेटरच्या नावाने ओळखला जाणारा हरभजन सिंगने ट्विटरवर म्हटलं की, ‘क्रिकेटबाबत सध्या खूप काही बातम्या आहेत. पण आता मला असं काही कळालं ज्यामुळे क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून जाईल.

<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”en” dir=”ltr”>Cricket aaj kal kaafi news mein hai, aur abhi abhi mujhe aisa kuch pata chala hai that will change the way you look at cricket forever! <a href=”https://twitter.com/hashtag/CricketKaKhulasa?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw”>#CricketKaKhulasa</a></p>&mdash; Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) <a href=”https://twitter.com/harbhajan_singh/status/1304737021005496320?ref_src=twsrc%5Etfw”>September 12, 2020</a></blockquote> <script async src=”https://platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>

हरभजनच्या या ट्विट नंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याने हॅशटॅग क्रिकेट का खुलासा देखील वापरला आहे. हरभजन सिंहने यंदा आयपीएलमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. हरभजन सिंह चेन्नई सुपर किंग्स कडून खेळत आहे. यंदा कोरोनामुळे आयपीएल यूएईमध्ये होत आहे. आयपीएलमध्ये हरभजनने आतापर्यंच चांगली कामगिरी केली आहे. तो सुरुवातील मुंबई इंडियंस (Mumbai Indians) आणि नंतर चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत होता. आयपीएलच्या 160 सामन्यांमध्ये त्याने 150 विकेट घेतल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here