कोकणी माणसांच्या सहनशीलतेला का नख लावताय?

0
106


कोकणच्या वाटेवर खड्डेरूपात दरसाल काटे पेरणाऱ्या राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे यंदाही ऐन गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. या मार्गावर या घडीला प्रवास कराल तर आपली हाडंपेडं मोडून घ्याल असा कोकणी माणसाचा एकूण अनुभव आहे. एसटी किंवा अन्य कोणत्याही वाहनाने आता प्रवास कराल तर तासाचे तीन तास लागत आहे. लॉकडाऊन असतानाही ही अवस्था आहे. या प्रश्नावर कोकणातील विविध मान्यवरांनी आवाज उठवला आहे. परंतु, निलाजरे सरकार अद्याप ढिम्म असताना अखेर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी या प्रश्नी ट्विटरच्या माध्यमातून का होईना आवाज उठवत सरकारला चिमटे काढले आहेत.

किमान आता तरी खड्डे बुजवा

भाजप नेते आशिष शेलार यांनी पनवेलपासून अगदी चिपळूणपर्यंत गेलेल्या मुंबई- गोवा महामार्गाची कशी वाट लागली आहे, हे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना पत्रव्यवहार करून निदर्शनास आणून दिले आहे. तसेच कोकणी जनतेला होत असलेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल लक्ष वेधले आहे.
गेल्यावर्षी खड्ड्यांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यंदा मुंबई-गोवा महामार्गावर हा स्तुत्य उपक्रम का राबवत नाही? कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना या या वर्षी एवढे का छळताय? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली का दिसत नाही?कोकणी माणसांच्या सहनशीलतेला का नख लावताय?
ऍड. आशिष शेलार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here